Breaking News

कर्जत ताडवाडी येथे आदिवासी महिलांना मारहाण

नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील ताडवाडी येथील जमिनी (सर्वे नंबर33/2) मध्ये शुक्रवारी (दि. 4) जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू होते. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन आदिवासी महिलांना तेथील तरूणांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

झाला आहे.

कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथील तुळसाबाई खंडवी या आदिवासी शेतकर्‍याची जमीन (सर्वे नंबर33/2) असून ती त्यांनी कोणत्याही व्यक्तीला किंवा बिगर आदिवासी शेतकर्‍याला विकलेली नाही. मात्र सदर जमिनीच्या सातबारा उतार्‍यावरील त्यांचे नाव गायब झाले आहे. त्याबद्दल त्यांनी महसूल विभागाकडे अर्जदेखील केला आहे. या जमिनीमध्ये काही लोकांकडून खोदकाम आणि सपाटीकरणाचे काम सुरु आहे. त्याबद्दल शेतकरी खंडवी यांनी तीन दिवसांपुर्वी नेरळ पोलीस ठाण्यात आपले म्हणणे मांडले होते. त्यावेळी पोलिसांनी जमिनीवर अतिक्रमण करणार्‍या व्यक्तींना समज देण्याचे आश्वासन दिले होते.

ताडवाडी येथील जमिनीमध्ये शुक्रवारी (दि. 4) एक्झर्बीया कंपनीचे दोन जेसीबी खोदकाम करीत होते, त्यावेळी जमिनीच्या मालक तुळसाबाई खंडवी यांनी जेसीबी चालकाला सदरची जागा आमची आहे, असे सांगून काम बंद करण्यास सांगितले. त्यावेळी तेथे असलेल्या पाच अनोळखी तरुणांनी तुळसाबाई खंडवी आणि रंजना प्रकाश खंडवी यांना हाताबुक्यांनी मारहाण व जातीवाचक शिवीगाळी करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या वेळी मोरेवाडी, ताडवाडी येथील विमल ठोंबरे, रंजना ठोंबरे, विमल खंडवी, सपना खंडवी, रामू खंडवी यांनी मारहाण थांबवली. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे करीत आहेत.

Check Also

केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवा -मंत्री आदिती तटकरे

माणगाव : प्रतिनिधी महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन विधानसभा …

Leave a Reply