Monday , June 5 2023
Breaking News

बोटीतून प्रवासी समुद्रात पडला, पोहता येत असल्याने बचावला

मुंबई गेट वे-मांडवादरम्यानची घटना

अलिबाग : प्रतिनिधी
मुंबई गेट वे ऑफ इंडिया येथून सकाळी मांडवाकडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या अजंठा बोटीतून एक प्रवासी भर समुद्रात पडल्याची घटना मंगळवारी (दि. 8) सकाळी घडली. प्रशांत कांबळे असे या प्रवाशाचे नाव असून पोहता येत असल्याने तो वाचला आहे. स्वतःच्या चुकीमुळे बोटीतून पडला असल्याने याबाबत कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही, मात्र अजंठा बोटीमधून प्रवासी अनेक वेळा जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अजंठा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
प्रशांत कांबळे हा प्रवासी सकाळी नऊच्या अजंठा बोटीने गेट वे येथून मांडवाकडे निघाला होता. बोटीच्या एका बाजूला तो उभा होता. त्या वेळी बोटीवरील कर्मचार्‍यांनी त्या ठिकाणी उभे राहू नका, असे सांगितले होते, मात्र प्रशांतने त्याकडे दुर्लक्ष केले आणि काही वेळाने तो सामानासकट भर समुद्रात पडला. पोहता येत असल्याने तो बोटीपर्यंत पोहत आला. बोटीतून त्याला दोरी टाकून खेचण्यात आले. त्यामुळे तो बचावला. प्रशांतने मी स्वतःच्या चुकीने पडलो असल्याचे मांडवा पोलिसांना सांगितले. त्यामुळे कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, मात्र अजंठा बोटीबाबत अनेक वेळा अपघात झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. याबाबत महाराष्ट्र मेरिटाईम विभागाने अजंठा बोटीची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply