Monday , June 5 2023
Breaking News

परशुराम घाटात दरड कोसळली; एका कामगाराचा मृत्यू

चिपळूण : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम सुरू असताना मंगळवारी (दि. 8) दरड कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
परशुराम घाटात डोंगर कटाईचे काम सुरू असताना मंगळवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास दरड कोसळली. डोंगराचा मोठा भाग अचानक खाली आल्याने जेसीबी मशीन अडकले. या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून दुसरा वाचला आहे.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply