Breaking News

नागोठणे रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा

नागोठणे : प्रतिनिधी – येथील रोटरी क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांचा पदग्रहण सोहळा पाटणसई ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल बाळाराममध्ये संपन्न झाला. या वेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन मोदी यांना रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. अनिल परमार यांच्या उपस्थितीत पदाची शपथ देण्यात आली. नागोठण्यात अद्ययावत मोठे रुग्णालय उभारण्यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातील, असा मनोदय सचिन मोदी यांनी या वेळी व्यक्त केला.

नागोठणे रोटरी क्लबचे नवनिर्वाचित सचिव गौतम जैन आणि खजिनदार निलेश सोळंकी यांनी मान्यवरांच्या हस्ते जबाबदारी स्वीकारली. डॉ. जी. एस. कोकणे, डॉ. सुनील पाटील, डॉ. अभिषेक शहासने, सुरेश जैन, अ‍ॅड. श्रीकांत रावकर, धीरज मोदी, प्रथमेश काळे, किशोर शिर्के, अप्पू कुट्टन, मांगीलाल चौधरी यांना नागोठणे रोटरी क्लबचे सदस्यत्वाचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

रोटरीचे डायरेक्टर मंजू फडके, रोहे रोटरी क्लबचे अध्यक्ष आशिष शहा, विक्रम जैन, मयूर दिवेकर, विकी सप्रे, सतीश महाडिक, स्वप्निल धनावडे, दिनेश जैन, स्वप्निल परांजपे, सुरेंद्र निंबाळकर, राजीव शहा, अमोल कुलकर्णी, संजय नाडकर, भावेश जैन आदी विविध रोटरी क्लबच्या पदाधिकार्‍यांसह सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते.

Check Also

दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षम करण्यासाठी आमची तळमळ -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्ततळागाळात दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षमपणे सामोरे जायला पाहिजे ही आमची तळमळ असते, …

Leave a Reply