पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक टॅब वितरण आणि रयत टिंकरींग लॅबचा उद्घाटन सोहळा बुधवारी (दि. 21) आयोजित करण्यात आला होता. या वेळी ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते 40 विद्यार्थ्यांना व 10 शिक्षकांना अशा एकूण 50 टॅबचे वितरण आणि रयत टिंकरींग लॅबचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमास ‘रयत’चे विभागीय निरीक्षक श्री. मोहिते, सहाय्यक निरीक्षक फडतरे, अधीक्षक श्री. कारंडे, कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, पंचायत समिती सदस्य राज पाटील,
स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सुभाषशेठ भोपी, बळीराम भोपी, राजेश भोपी, वंदना भोपी, रिटघरचे पोलीस पाटील दीपक पाटील, रमेश चौधरी, बाळकृष्ण सिनारे, प्राचार्य बी. एस. नाईक यांच्यासह विद्यालयातील सेवकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या सहकार्याने दहावी आणि बारावीतील विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी हा टॅब वितरणचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. सध्या कोविड-19ची परिस्थिती लक्षात घेता या काळात दिलेल्या टॅबचा फायदा विद्यार्थी व शिक्षकांना होईल व मुले ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहणार नाही. त्याचप्रमाणे रयत टिंकरींग लॅबचाही विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना मोलाचा उपयोग होणार आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …