Breaking News

खारघरच्या रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये वैयक्तिक कौशल्यासाठी विचारमंथन सत्र

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील करिअर मार्गदर्शन कक्ष आणि इंग्रजी विभागातर्फे बुधवारी (दि. 9) वैयक्तिक कौशल्यासाठी विचारमंथन सत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी व्यवस्थापन विभागातील प्रा. मीरा पटेल हया प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांच्या कौशल्याची चाचणी पाहण्याकरिता त्यांना विशिष्ट प्रकारचे वेबपोर्टल वापरून, जोहारी विंडोबद्दल माहिती दिली. त्यातून त्यांना सांघिक कियाकल्पांमधील फायदे व सहकार्याचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना एकमेकांची मते मांडण्याची तसेच इतर विदयार्थ्यांच्या मतांचा आदर करण्याविषयीचे डथजढ अपरश्रूीळी या टूलने सादरीकरण केले. या वेळी महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. संजय मराठे यांनी आजच्या स्पधेच्या युगातील तांञिक बाबींवर लक्ष ठेवण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित केले. या कायर्र्क्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे आयोजन करिअर मार्गदर्शन कक्ष आणि इंग्रजी विभागप्रमुख डॉ. महादेव चव्हाण यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिले. प्रा. राहुल कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रा. रोहित पाटील यांनी सहकार्य केले. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वैयक्तिक कौशल्यासाठी जागरुकता निर्माण केल्याबद्दल आयोजकांची प्रशंसा केली तसेच संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेेचे सचिव डॉ. सिध्देश्वर गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply