Breaking News

गव्हाण विद्यालयात कोरोना प्रतिबंधक दुसर्‍या डोसचे लसीकरण

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ .भगत ज्युनियर कॉलेजमध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यास सुरुवात झाली. प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमांतर्गत पहिल्या डोसच्या यशस्वी लसीकरणानंतर बहुतेक पात्र विद्यार्थ्यांना, विशेषतः इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेपूर्वी लसीकरण करण्याच्या दृष्टीने विद्यालयामध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अस्मिता बोंबटकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ.कृतिका पाटणकर, डॉ. तनिष्क ओबेरॉय, आरोग्य सहायक सुलभा खाडे, सुरक्षारक्षक सुबोध चौगुले, डेटा ऑपरेटर हर्षल पवार यांचे पथक विद्यार्थ्यांच्या लसीकरणास तत्परतेने सेवा पुरवित असल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांनी दिली. विद्यार्थ्यांचे लसीकरण वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने इयत्ता दहावी आणि बारावीचे सर्व वर्ग शिक्षक, प्राचार्या साधना डोईफोडे, त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य तसेच रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक प्रमोद कोळी, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक जगन्नाथ जाधव, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे हे सर्वजण विशेष परिश्रम घेत आहेत.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply