अलिबाग : प्रतिनिधी
ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने बनावट पत्र प्रसिद्ध केल्याप्रकरणी शुभम काळे या तरुणाला रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली आहे. शुभम काळे याला सोमवारी (दि. 24) अलिबाग न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यातील दुर्घटनेनंतर डॉ. आप्पासाहेब यांनी जो शोकसंदेश प्रसारित केला होता त्या पत्राचा आधार घेत डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे बनावट पत्र तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. ‘आपण पुरस्कार परत करणार असून यापुढे भाजप व शिंदे गटाला मतदान करू नका’ असा मजकूर या पत्रात छापण्यात आला होता. या बनावट पत्रप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू केला होता.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper