Breaking News

सह्याद्री सामाजिक विकास संस्थेतर्फे अ‍ॅड. मनोज भुजबळ यांचे आभार

पनवेल : रामप्रहर वृत्त

सह्याद्री सामाजिक विकास संस्थेतर्फे एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीमध्ये संस्थेचे सदस्य व पनवेल महापालिकचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनीही सहभाग घेतला होता तसेच त्यांनी निशुल्क फार्महाऊस उपलब्ध करून दिले त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. एक दिवसीय सहलीमध्ये क्रिकेट, संगीत खुर्ची, कबड्डी असे अनेक खेळ झाले. या सर्व खेळांमध्ये नगरसेवक अ‍ॅड. भुजबळ यांनी सहभाग घेतला होता. या वेळी संस्थेची वेबसाइटचा लोकार्पण सोहळासुद्धा नगरसेवक अ‍ॅड. भुजबळ यांच्या हस्ते झाला. संस्थेचे गणेश मुधळे, मनोहर गावडे, संस्थेचे अध्यक्ष ढवळे व संस्थेतील सर्वच पदाधिकारी यांनी ही सहल खूप खूप एन्जॉय केली. दरम्यान, संस्थेच्या अनेक पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. नगरसेवक अ‍ॅड. भुजबळ यांनी या वेळी संस्थेला बळकटी देण्यासाठी संस्थेची पुढील ध्येय धोरणे आणि विकासाबाबतची योग्य पाऊले कशी टाकायची, संस्था कशी पुढे घेऊन जायची, संस्थेच्या माध्यमातून आपल्याला शासकीय कामे सुद्धा अशाप्रकारे उपलब्ध करून देता येईल, याचे नियोजन मार्गदर्शनातून सांगितले. नगरसेवक अ‍ॅड. भुजबळ यांच्या उत्कर्ष संस्थेच्या कार्याबद्दलही माहिती दिली.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply