Breaking News

विनामास्क फिरणार्यांवर कर्जत न. प.ची दंडात्मक कारवाई

कर्जत ः प्रतिनिधी

तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग व प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहन करण्यात येत आहे. तरी नागरिक बाजारपेठेत विनामास्क फिरत आहेत. अशा बेशिस्त नागरिकांवर कर्जत नगर परिषदेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.

कर्जत तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत नगर परिषदेकडून सोमवारी विनामास्क फिरणार्‍या 16, तर मंगळवारी 13 अशा एकूण 29 जणांवर प्रत्येकी 500 रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली. कर्जत बाजारपेठेत मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील स्वतः तसेच कार्यालयीन अधीक्षक अरविंद नातू, जितेंद्र गोसावी, सुदाम म्हसे, अशोक भालेराव, सुरेश खैरे, तर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार वसंत वराडे, पोलीस नाईक अशोक राठोड, किरण शेळके, महिला पोलीस कर्मचारी प्रीतम देशमुख, पूनम ढोमे, जया खंडागळे आदींनी ही कारवाई केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply