Breaking News

भाजप वाहतूक सेल उपजिल्हा संयोजकपदी विजय धामणे

पेण : प्रतिनिधी

रायगड भाजप वाहतूक सेल उपजिल्हा संयोजकपदी नुकतीच पेण येथील विजय धामणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दक्षिण रायगड वाहतूक सेल जिल्हा संयोजक संकेत पोरे यांच्या अध्यक्षतेखाली विजय धामणे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी माजी नगराध्यक्ष रघुनाथ बोरेकर, गणेश चव्हाण, अशोक शिंगाडे हे उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करत केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवून पक्ष संघटना मजबूत करण्याच्या कामाची जबाबदारी या नियुक्तीने विजय धामणे यांच्यावर देण्यात आली आहे.

रायगड भाजप वाहतूक सेल उपजिल्हा संयोजकपदी विजय धामणे यांची नियुक्ती झाल्याचे कळताच भाजप पदाधिकारी, मित्रपरिवार आदींनी अभिनंदनाचा वर्षाव विजय धामणे यांच्यावर करण्यात आला.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply