पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सशस्त्र क्रांती आणून स्वातंत्र्याचा लढा बळकट करणारे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी (दि. 17) भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या जन्मस्थळी शिरढोण येथे भेट देत त्यांच्या स्मारकाला अभिवादन केले. यासोबतच मशाल रॅलीत सहभाग घेतला. या वेळी दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, भाजप केळवणे विभागीय जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कोअर कमिटी अध्यक्ष प्रितेश मुकादम, शिरढोणच्या सरपंच साधना कातकरी, उपसरपंच मोनाली घरत, सदस्य विजय भोपी, गजानन घरत, प्रमोद कर्णेकर, सानिका कातकरी, भाऊ वाजेकर, रेहमा वाजेकर, भगवान मुकादम, श्याम पवार, अनिता भोपी, संगीत चौधरी, भास्कर वाकडीकर आदी उपस्थित होते.