Breaking News

मातीपासून घडविल्या जाताहेत सुबक इकोफ्रेन्डली गणेशमूर्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोनोच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बेळगावातील तेरा कोटा या मातीपासून पर्यावरण पूरक गणेशमूर्ती पनवेल तालुक्यातील तारा येथील युसुफ मेहेर अली सेंटरमध्ये ग्राम उद्योग प्रकल्पात साकारल्या जात आहेत.

महाराष्ट्रात गणेशोत्सव या सणाला अनन्य साधारण महत्व आहे. मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी माणसामाणसात दुरी बाळगणे अतिशय गरजेचे आहे. शासनाने या करिता अनेक स्तरातून जनजागृती अभियान राबवले आहे. ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करण्यात येते, मात्र यावर्षी दुरी ठेवूनच करावा लागणार आहे. दरवर्षी येथील कुंभार कारागीर विभागात पर्यावरण पूरक गणेशमूर्ती साकारल्या जातात. येथील गणेशमूर्तींना नवी मुंबई परिसरात चांगली मागणी असते. टेराकोटा माती बेळगाववरून आणण्यात येते आणि या मातीपासून अर्धा फुटापासून ते अडीच फुटापर्यंत कोणतीही रंगरंगोटी न करता फक्त डोळ्यांची आखणी करून त्याच मातीच्या रंगाने रंगवली जाते. तीन किलोपासून सात किलोपर्यंत या मुर्तींचे वजन असून या मूर्ती दिसायला खूप आकर्षक आहेत. 350 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत या गणेशमुर्ती उपलब्ध आहेत. तसेच अगदी थोड्या पाण्यात या मुर्तींचे विसर्जन करता येते, या मुर्ती पाण्यात फक्त दहा मिनिटात विरघळून जात असल्याचे येथील कारागीर प्रकाश तांबे यांनी दैनिक रामप्रहरच्या प्रतिनिधीला बोलताना सांगितले. त्याचबरोबर या मूर्ती घरपोच देखील केल्या जातील या साठी दता शिंगणे (मा. 8007170783) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply