Breaking News

भाजप महिला मोर्चातर्फे रविवारी हळदीकुंकू समारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजप खांदा कॉलनी महिला मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. 20) सायंकाळी 4 वाजता हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजप महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, पनवेल मनपाच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, शकुंतला रामशेठ ठाकूर, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, पं. स. सदस्य तथा महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्ष वर्षा नाईक, प्रकृती मनोहर म्हात्रे, मानिका एकनाथ गायकवाड, प्रेमा संजय भोपी यांची उपस्थिती लाभणार आहे. खांदा कॉलनी सेक्टर 9 येथील श्रीकृपा हॉलमध्ये होणार्‍या या समारंभात सायंकाळी 5 वाजता एकता महिला मंडळाच्या वतीने मंगळागौर व 6 वाजता भाजप साऊथ सेल खांदेश्वर महिला भजन मंडळ, खांदा कॉलनीतर्फे भजन होणार आहे.

खांदा कॉलनी भाजपतर्फे शिवजयंती

पनवेल : दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय जनता पक्ष खांदा कॉलनीच्या वतीने शनिवारी (दि. 19) भाजप कार्यालय जनसंपर्क कार्यालय, सेक्टर 1 खांदा कॉलनी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply