Tuesday , February 7 2023

पनवेल मनपाकडे 57 कोटी मालमत्ता कर जमा; सवलतीचा आजचा अखेरचा दिवस

नवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांचा मालमत्ता कर भरण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून 30 सप्टेंबरपर्यंत मालमत्ता करांवरती 10 टक्के सवलत तसेच ऑनलाइन कर भरल्यास वाढीव दोन टक्के सूट देण्यात आली आहे. बुधवारी (दि .29) दैनिक संकलन एक कोटी झाले असून एकूण 57 कोटी कर संकलन झाले आहे. या सवलतीचा गुरुवारी (दि. 30) अखेरचा दिवस असून या सवलतीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. पनवेल महापालिकेने सुधारित मालमत्ता कर आकारणीवरती 31 जुलैपर्यंत 17 टक्के कर सवलत दिली होती. आता पुन्हा एकदा मालमत्ता करांवर 10 टक्के सूट तसेच ऑनलाइन कर भरल्यास वाढीव दोन टक्के सूट अशी एकुण 12 टक्के सवलत देण्यात आली आहे. मालमत्ता कराचा भरणा www.panvelmc.org या संकेतस्थळावर ऑनलाइन भरल्यास दोन टक्के सवलत मिळणार आहे. सौर ऊर्जा, जलसंवर्धन अर्थात रेन हार्वेस्टिंग, कचरा विलगीकरण, कचरा विल्हेवाट लावणे अशा विशेष सुविधा असणार्‍या कर दात्यांना प्रत्येकी दोन टक्के सवलत मिळेल. 

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply