महाड : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव येथे शनिवारी (दि. 26) मध्यरात्री बलेनो कारची बसला धडक बसून तिघांचा मृत्यू आणि दोन जण जखमी झाले आहेत.
मुंबईच्या दिशेने जाणार्या बलेनो कारने (एमएच 05-डीएस 6861) समोरून येणार्या बसला (एमएच 48-बीएम 6299) धडक दिली. या अपघातात कारमधील संदीप सीताराम पाटील (40, ठाणे) यांचा जागीच, तर अनिल दत्ताराम राणे (45) व साधना निलेश राऊत (45, मुंबई) यांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. कारचालक दीपक सीताराम पाटील व सुगंधा सीताराम पाटील (ठाणे) गंभीर जखमी झाले आहेत.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …