Breaking News

कळंबोलीतील कोविड सेंटरची जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी

पनवेल : वार्ताहर

पनवेल महापालिका आणि वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून कळंबोलीच्या सेक्टर 5 ईमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सेंटरमध्ये रुग्णाचे समुपदेशनापासून ते फिजिओथेरपीची सुविधा दिली जात आहे.रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नुकतीच या कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले. कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता उरण आणि नवी मुंबई परिसरात कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यानंतर कळंबोली येथील सेक्टर 5 ई मध्ये 60 ऑक्सिजन बेड्स आणि 12 आयसीयू बेड्सचे सेंटर सुरू करण्यात आले. गेल्या 10 दिवसांपासून हे सेंटर सुरू असून सध्या या सेंटरमध्ये 70 कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त संजय शिंदे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून हे सेंटर सुरू आहे. कोविड सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि परिचारिकांची फळी रुग्णसेवेसाठी तैनात आहे. सेंटरमध्ये आहारतज्ञ, मानसोपचार तज्ञदेखील तैनात असल्याचे वन रुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले यांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply