आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासाची विविध कामे सुरू आहेत. त्यालाच अनुसरून देवद आणि वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायत हद्दीतही विकासकामे करण्यात येत असून त्याचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 26) झाले.
पनवेल तालुक्यातील देवद ग्रामपंचायत परिसरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून मोरी क्रमांक 1 ते नरेश वाघमारे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, जि. प. शाळा दुरुस्ती करणे, ग्रामपंचायत निधीमधून त्रिमूर्ती श्लोक सोसायटी ते स्क्वेअर रेसिडेन्सीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे, 15व्या वित्त आयोगातून मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन ग्रामपंचायतीकरिता स्वतंत्र करणे, खुली व्यायामशाळा तयार करणे आणि 14व्या वित्त आयोगातून मैत्री सोसायटी ते दत्तनाथ आंगन सोसायटीपर्यंत ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम करण्यात येत आहे. या विकासकामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले.
याशिवाय वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायत हद्दीतील वांगणी आणि आदिवासावाडीत केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलमिशन अंतर्गत आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. 34 लाख 26 हजार 500 रुपयांचा निधी वापरून होणार्या या कामाचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाला.
या कार्यक्रमांना भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, जि. प. सदस्य अमित जाधव, देवद ग्रामपंचायतीच्या सरपंच शितल सोनावणे, सदस्य विनोद वाघमारे, दिनेश वाघमारे, निलेश जुवेकर, वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा पवार, उपसरपंच अक्षता म्हात्रे, भाजपचे वामन वाघमारे, कैलास वाघमारे, राम वाघमारे, अरुण वाघमारे, उत्तर वाघमारे, रामा वाघमारे, ज्ञानोबा कांबळे, भगवान भंडारी, किशोर सुरते, गणेश वाघमारे, अनंता वाघमारे, नामदेव पाटील, पद्माकर वाघमारे, प्रवीण वाघमारे, नितीन वाघमारे, गोविंद पाटील, गणा वाघमारे, श्याम वाघमारे, जयेश वाघमारे, डॉ. कृष्णा देसाई, जितकुमार सिंग, एस. टी. मेटकरी, योगेश पाटील, चक्रपाणी म्हात्रे, संतोष शेळके, किशोर सुरते, सतिश मालुसरे, महेंद्र भोईर, प्रवीण म्हात्रे, प्रवीण पाटील, संतोष पाटील, हरिश्चंद्र भालेकर, निवृत्ती मालुसरे, बळीशेठ मालुसरे, लहू जळे, एकनाथ शिंदे, गणेश पाटील, एकनाथ कडव, संतोष घरत, अप्पा पाटील, गणपत शेळके, भगवान कातकरी, सुवर्णा पाटील, संपदा पालव, लीलाबाई कातकरी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.