पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय इंग्रजी माध्यमात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता सोमवारी (दि. 28) शुभेच्छा चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पूजनाने झाली. यानंतर स्व. जनार्दन भगत आणि पिताश्री चांगू काना ठाकूर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जीनल प्रजापत हिने नृत्यातून गणेश वंदना सादर केली. 29 फेबु्रवारी हा स्व. जनार्दन भगत यांच्या जयंतीचा दिवस म्हणून या सोहळ्यात स्व. जनार्दन भगत साहेबांना आदरांजली अर्पण केली गेली. प्रमुख पाहुणे म्हणून जयश्री देवधर उपस्थित होत्या. प्रास्ताविकात मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना भरपूर अभ्यास करा आणि विश्वासाने परिक्षेस सामोरे जा असे सांगत बोर्ड परीक्षेस शुभेच्छा दिल्या.
शुभम तिवारी, प्राजक्ता बांदेकर, शुभदा देशमुख, संचिता खोपकर, सानिका जाधव, आदित्य कुलकर्णी, निकिता भन्साळे, स्वरा पवार, जीनल प्रजापत, सई जोशी, साक्षी गुप्ता, जयेश भाईगडे, अथर्व चव्हाण, प्राची पाटील, अनन्या झा, यश पांडव, आरती गुप्ता, सिध्दी भोसले, साधिका मनसुरी या विद्यार्थ्यांनी आपले भावपूर्ण मनोगत व्यक्त करत शिक्षकांचे आभार मानले.
संचिता, यश आणि सई यांनी वर्गशिक्षक प्रकाश पांढरे, मंजुषा भगत आणि स्वाती काळे यांना पुष्पगुच्छ देऊन वंदन केले. प्रि-प्रायमरी सेक्शनच्या गीता जगताप यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रमुख अतिथी जयश्री देवधर यांनी विद्यार्थ्यांना मनावर ताण न ठेवता परिक्षेस सामोरे जा असा संदेश दिला.
कार्यक्रमास सीकेटी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक निलिमा शिंदे, प्रि प्रायमरी सुपरवायझर संध्या अय्यर, तसेच इंग्रजी माध्यमिक सुपरवायझर निरजा अदुरी आदी उपस्थित होते.
सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी गडदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी शुभेच्छा देण्यात दिल्या आहेत.