बी. बी. बांठिया ज्वेलर्सचा अनोखा उपक्रम
पनवेल : वार्ताहर
पनवेलमध्ये प्रथमच सप्तपदी वेडींग ज्वेलरी कलेक्शनच्या माध्यमातून नामांकित अशा तरुण व तरुणी वर्ग रॅम्प वॉक केले असून शहरातील सुप्रसिद्ध बी. बी. बांठिया ज्वेलर्स यांच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला होता.
रायगड जिल्ह्यात प्रथमच ज्वेलरी फॅशन शोचे आयोजन आले होते. त्यामुळे पनवेल, उरणसह नवी मुंबई व रायगड परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसुन आली. वेडिंग डिझाईन्स ग्राहकांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते.
या ज्वेलरी फॅशन शो चे नियोजन अथर्व मीडिया वर्ल्ड चे सर्वेसर्वा मिलिंद राणे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले. प्रसिद्ध फॅशन शो दिग्दर्शक यश शेलार यांनी हे फॅशन शोसाठी दिग्दर्शन केले तसेच या दागिन्यांची घडणावळ ज्वेलरी कन्सल्टंट नवीन सदारंगानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. कोरोना प्रतिबंधक निर्बंध अद्यापही काही प्रमाणात लागू असल्याने मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश दिला गेला होता. उपस्थित मान्यवरांचे स्वागत राजेश बांठिया यांच्यासमवेत गौरव बांठिया, वैभव बांठिया, सुयोग बांठिया आदींनी केले.
यानिमित्त पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक राजू सोनी, डॉ. गिरीश गुणे व अॅड. मनोहर पाटील यांना जेम्स ऑफ पनवेल हा अॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे इतर मान्यवरांनासुद्धा विविध अॅवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.
अनेक नामांकित अशा मॉडेल यांनी या वेळी विविध दागिन्यांनी नटून रॅम्प वॉक केला व पनवेलकरांची मने जिंकली. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे अनेक तरुण व तरुणींना एक वेगळ्या क्षेत्रात वाव मिळाला आहे. अशा प्रकारचे आयोजन यापुढेसुद्धा करण्यात येईल, अशी माहिती अथर्व ग्राफीक्सचे मिलिंद राणे यांनी या वेळी दिली.