Breaking News

कामोठेमधील उद्यानाची साफसफाई

नगरसेवक विकास घरत यांचा पाठपुरावा

कामोेठे : रामप्रहर वृत्त

कामोठे मधील सेक्टर 36 मधील प्लॉट नं-17अ येथे असलेल्या उद्यानामध्ये अस्वच्छता पसरली होती. त्यामुळे येथे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता नगरसेवक विकास घरत यांनी पाहणी करून त्वरित साफसफाई करून घेण्यास सुरुवात केली.

कामोठे मधील सेक्टर 36 मधील उद्यान हे परिसरातील लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी असलेले ठिकाण आहे. परिसरातील अनेक गृहिणीदेखील विरंगुळ्यासाठी येथे येतात. सकाळ-संध्याकाळ गजबज असलेल्या या उद्यानामध्ये गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे झाडे झुडपे आणि गवत भरपूर वाढले होते. वाढलेल्या गवतामुळे सरपटणारे प्राणी किंवा कीटकांचा धोका निर्माण झाला होता. या उद्यानाची पाहणी करत असताना नगरसेवक विकास घरत यांच्या लक्षात ही बाब आली. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन नगरसेवक विकास घरत यांनी उद्यानाच्या सफाईचे काम करून घेतले.

रहिवाशांना होऊ शकणार्‍या त्रासाची दखल घेऊन उद्यानाची सफाई कामाला सुरुवात केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी नगरसेवक विकास घरत यांचे कौतुक केले आणि उद्यानाच्या होत असलेल्या साफसफाई कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply