रोहे : प्रतिनिधी
तालुक्यातील रोहा, नागोठणे, कोलाड, चणेरा विभागात शुक्रवारपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. रोहा तालुक्यात शुक्रवारी 2026 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. तर 42 विद्यार्थी गैरहजर होते.
रोह्यातील विद्यार्थ्यांची शुक्रवारी सकाळी 9.30 वाजल्यापासूनच पालकांसोबत परीक्षा केंद्रावर लगबग सुरू होती. पहिला इंग्रजी पेपर 10.30 ते 2 दरम्यान घेण्यात आला. तालुक्यातील चणेरा, सानेगाव, रोहा, खांब, धाटाव, कोलाड, वरसगाव, नागोठणे येथील केंद्रावर बारावीची परीक्षा घेण्यात आली.
परीक्षेला बसलेले विद्यार्थी
परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांची संख्या
रोहा 457
चणेरा 67
सानेगाव 17
जे.एम.राठी स्कूल 43
कोलाड 591
धाटाव 144
खांब 25
चिंचवली 133
नागोठणे 384
उर्दू 51
रिलायन्स हायस्कूल 80