Breaking News

नागोठणे केंद्रावर 519 परीक्षार्थी

नागोठणे : प्रतिनिधी

येथील अग्रवाल विद्यामंदिर परीक्षा केंद्रावर शुक्रवारपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या दीर्घ कालावधीनंतर प्रथमच ऑफलाइन परीक्षा होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर कभी ख़ुशी कभी गम पाहायला मिळत आहे.

या परीक्षा केंद्रावर विविध शाखेचे एकूण 519 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांना लिखाणाचा तणाव येऊ नये, यासाठी वेळ अर्ध्या तासाने वाढविण्यात आली असल्याचे प्राचार्य महादेव पाटील यांनी सांगितले.

Check Also

विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रांचा अनुभव घ्यावा -लोकनेते रामशेठ ठाकूर

उरण : रामप्रहर वृत्तकर्मवीर अण्णांनी दिलेला शिक्षण आणि संस्कारांचा आदर्श आपल्याला पुढे घेऊन जाणे अत्यंत …

Leave a Reply