कर्जत : बातमीदार
आदित्य दृष्टी सामाजिक विकास प्रतिष्ठान तर्फे कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रुपग्रामपंचायत कार्यालयात महिला बचत गटांसाठी मसाले प्रॉडक्ट्स बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंशु अभिषेक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नसरापूरच्या सरपंच प्रमिला मोहिते, माजी ग्रामपंचायत सदस्य अॅड. संपत हडप, महिला बचतगट सीआरपी योगिता कोळंबे, ज्ञानगंगा ग्रामसंघाच्या हर्षदा थोरवे, ग्रामसंघाच्या सचिव सविता तिखंडे, कोषाध्यक्ष मनीषा देशमुख आदींसह ग्रामसंघातील महिला सदस्या उपस्थित होत्या. या शिबिरात प्रशिक्षिका सुनीता प्रभू देगिणाळ यांनी शिबिरार्थी महिलांना प्रामुख्याने मिरची मसाला, मीठ मसाला, सांबर मसाला, पावभाजी मसाला, चहा मसाला, चिकन मसाला, गरम मसाला, भाजी मसाला, चाट मसाला तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.