Breaking News

निलगाय शिरली शेतकर्‍याच्या घरात; उपचारानंतर जंगलात रवानगी

कर्जत : बातमीदार

काळवीटसारखी दिसणारी जंगलातील निलगाय वांगणी गावातील एका शेतकर्‍याच्या घरात घुसली. या शेतकर्‍याने या निलगायीला बदलापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आणि पोलिसांनी सर्व नोंदी घेतल्यानंतर निलगायील सुरक्षित जंगलात सोडण्यात आले. जंगलात रस्ता चुकलेली व कुत्रे मागे लागल्याने घाबरलेली जखमी निलगाय कर्जत तालुक्याच्या हद्दीला लागून असलेल्या वांगणी गावातील कमलाकर जांगरे यांच्या घरात शिरली होती. तिला पाहून सर्वांची तारांबळ उडाली. या निलगायीची माहिती वनविभागला देण्यात आली. वनविभागाचे राऊंड अधिकारी श्रीकांत राऊत यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. या निलगायीची पाहणी केली असता ती जखमी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर चामटोली येथील पाणवठा या अपंग प्राण्यांच्या अनाथाश्रमाचे संचालक गणराज जैन यांच्याशी संपर्क साधण्यात आला. गणराज जैन यांनी पाणवठाच्या काही सदस्यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी वनविभागाचे कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमी निलगायीला पाणवठा अनाथाश्रमात दाखल केले. तेथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती म्हात्रे यांनी तिच्यावर उपचार केले. दोन दिवसांनंतर निलगायीला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. वनविभागाने निलगायीला सुरक्षित जंगलात सोडले. या वेळी पाणवठा आश्रमाचे गणराज जैन, डॉ. अर्चना जैन, नितीन कांबळे, दत्ता लोहकरे, आकाश हिंदोळा, प्रथमेश त्रिभुवन, प्रसाद दळवी, हेमश्वेता पांचाळ, रोहित गोविलकर, प्रकाश थापा यांच्यासह वनविभागाचे अधिकारी, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही -खासदार श्रीरंग बारणे

पनवेल : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. आता …

Leave a Reply