नवी मुंबई ः बातमीदार
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा, अध्यात्मिक सेवा व बालसंस्कार केंद्र सेक्टर 18 नेरुळ येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
सकाळी 8 वाजता महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक होऊन, आरतीनंतर शेकडो सेवेकरी भाविकांच्या उपस्थिती श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण पार पडले. सकाळी 11 वाजता बालसंस्कार विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात 80 विद्यार्थी सहभागी झाले होते. सायंकाळी 5.30. ते 8 वाजेपर्यंत नेरूळ पश्चिममध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात हजारो सेवेकरी भाविकांनी नेरूळ केंद्रात दर्शनाचा लाभ घेतला. सर्व कार्यक्रम सेवा केंद्र प्रतिनिधी व श्रीस्वामी समर्थ मंडळ से 18 चे प्रतिनिधी यांच्या नियोजनानुसार पार पडले.