पनवेल : रामप्रहर वृत्त
मायनॉरिटी गर्ल्स शाळा पनवेलला अनेक वर्षापासून संगणक कक्षाची आवश्यकता होती. प्रसिद्ध समाजसेवक नाजीम नालखंडे यांनी पुढाकार घेऊन आपली स्वर्गवासी आई मैमुना हसन नालखंडे यांच्या नावाने स्थापित केलेल्या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्वखर्चाने संगणक कक्ष बांधून दिला. या संगणक कक्षाचे उद्घाटन कोकण मर्कंटाईल बँकेचे चेअरमन नजीब मुल्ला यांच्या हस्ते झाले.
बजम अलम व अदबचे अध्यक्ष अजीम मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात नाजीम नालखंडे यांनी घोषणा केली की, या शाळेच्या 20 विद्यार्थ्यार्ंची 50 टक्के फी ते भरणार आहेत. त्यांनी शेवटी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, उच्च शिक्षण घेऊन समाजामध्ये आपले स्थान निर्माण करावे.
या वेळी पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इकबाल काजी, अजीम मुल्ला, नजीब मुल्ला, अकिल अधिकारी, नगरसेवक मुकीत काजी यांनी आपल्या भाषणांत नाजीम नालखंडे यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि म्हणाले की, समाजाला नाजीम नालखंडे यांच्यासारख्या महान लोकांची गरज आहे. नाजीम यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या वेळी पीपल्स अॅण्ड पॅरेन्टस असोसिएशनचे सर्वेसर्वा हमीद धुरू, रेहान तुंगेकर, जुबेर पित्तु, बासीत पटेल, अस्लम पठाण यांच्यासह विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.