पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालय येथे कोरोनाग्रस्तांच्या नातेवाइकांसाठी नगरसेवक नितीन पाटील यांच्या वतीने तात्पुरता निवारा शेड व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे येणारे रुग्णांचे नातेवाईक या सेवेबद्दल समाधान व्यक्त करीत आहेत. पनवेल महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये कोरोना पिडीत रुग्ण दाखल होत आहे. त्यानुसार कोविड-19चा वाढता प्रादुर्भाव पाहता उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे कोरोना पीडित असंख्य रुग्ण दाखल होत आगे. त्यांना विचारपूस अथवा मदत करण्यासाठी अनेक नातेवाईक रुग्णालयात येत असतात, नातेवाइकांना एक ठिकाणी विश्रांती मिळावी यासाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत रामशेठ ठाकूर यांच्या सूचनेनुसार नगरसेवक नितीन पाटील यांच्या वतीने तात्पुरता निवारा शेड व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.