Breaking News

आरोग्य दिनानिमित्त सायकल रॅलीमार्फत जनजागृती

खारघर भाजपचा उपक्रम

खारघर : रामप्रहर वृत्त

जागतिक आरोग्य दिनानिमित्त भाजप खारघर मंडलच्या वतीने खारघर शहरातील नागरिकांमध्ये निरामय आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी सायकल रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करून जागतिक आरोग्य दिन साजरा केला गेला.

उत्सव चौकपासून बँक ऑफ इंडिया-नवरंग-खारघरचा राजा- शिवाजी चौक-शिल्प चौक-डेली बाजार ते भाजप जनसंपर्क कार्यालय ह्या मार्गातून सायकल रॅली काढली गेली. या रॅलीला भाजपचे कार्यकर्ते व नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी कोरोनातील लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यावसायिक नुकसान झाले, त्यातून आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, मानसिक स्वास्थ्य बिघडले त्यातून बाहेर निघण्यासाठी व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे, असे मत व्यक्त केले.

या रॅलीत भारतीय जनता पक्ष खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर, नगरसेवक रामजी बेरा, शत्रुघ्न काकडे, सरचिटणीस दीपक शिंदे, युवा नेते समीर कदम, युवा मोर्चा सरचिटणीस अमर उपाध्याय, माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर, प्रभाग 4 अध्यक्ष वासुदेव पाटील, वैद्यकीय आघाडी संयोजक किरण पाटील, मंडल उपाध्यक्ष संजय घरत, जिल्हा चिटणीस गीता चौधरी, स्मिता आचार्य, विलास आलेकर, अशोक जांगिड़, सुष्मित डोलस, सचिन चिखलकर या भाजप कार्यकर्त्यांनी व अनेक नागरिकांनी भाग घेतला.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply