Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त आवाहन

सहकारी भगिनी व बंधूंनो.. सप्रेम नमस्कार!
5 ऑगस्ट रोजी माझा जन्मदिन. या जन्मदिनी आपण आवर्जून प्रत्यक्ष भेटून अथवा सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून शुभेच्छा देत असता. आपल्या या शुभेच्छा मलाही सामाजिक कार्यात झोकून देऊन काम करण्याची प्रेरणा देत आल्या आहेत.
सध्याच्या कोरोना संक्रमणाच्या काळात एकत्र येण्यावर व सामाजिक कार्यावर बंधने आली आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आपण सहभागी होत असलेले आरोग्य महाशिबिर या वर्षी याच बंधनांमुळे आयोजित करता आले नाही, शिवाय अनेक सहकारी सहृदयांच्या परिवारात कोरोनाच्या आघातामुळे दु:खाची छाया आहे. अशा स्थितीत वाढदिवस साजरा करणे योग्य नाही. म्हणूनच आपणास नम्र विनंती आहे की, वाढदिवसाच्या दिवशी भेटण्याचा आग्रह धरू नये. जाहिराती अथवा बॅनर्सपेक्षा नेहमीप्रमाणे सामाजिक कार्य करून आपल्या शुभेच्छा द्या. मला त्या नक्की पोहोचतील. जन्मदिन एक दिवसाचा. तुमच्या शुभेच्छा मला सातत्याने मिळाल्या आहेत. तुमचे शुभाशीर्वाद व सहकार्यामुळेच आजवरची वाटचाल संपन्न झाली. हे शुभाशीर्वाद आणि सहकार्य कायम राहू द्या.
आपला स्नेहाभिलाषी,
आमदार प्रशांत ठाकूर (अध्यक्ष, भाजप उत्तर रायगड जिल्हा)

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply