खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटातील शिंग्रोबा मंदिराजवळ असणार्या तीव्र चढ व वळणावर गुरुवारी (दि. 14) पहाटेच्या सुमारास पाइप घेऊन पुणे येथे जाणारा ट्रक (एमएच-15,बीके-4057) चालकासह 100 फुट खोल दरीत कोसळला. बोरघाट पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दरीत कोसळलेल्या ट्रकचा चालक सुनिल माडी (वय 46, रा. धुळे) याला दोरीच्या सहाय्याने दरीतून सुखरूप बाहेर काढले.