पनवेल : बातमीदार : वाचन संस्कृतीचा विकास व्हावा या हेतूने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपुते बीएड्-एमएड् महाविद्यालयात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुस्तकरूपी ज्ञानाची गुढी उभारण्यात आली. आदर्श समूहाचे चेअरमन धनराज विसपुते व संचालिका संगीता विसपुते यांच्या प्रेरणेने हा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. सीमा कांबळे यांनी विद्यार्थी जीवनातील ज्ञानाच्या गुढीचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. विनायक लोहार, प्रा. विजय मोरे, ग्रंथपाल ज्योती मराठे, डॉ. छाया शिरसाठ, प्रा. अपर्णा कांबळे या सर्वांनी परिश्रम घेतले.