कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार
नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनची बैठक कर्जतचे प्रांताधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच झाली. त्यामध्ये त्यांनी तालुक्यात नैसर्गिक आपत्ती ओढवू नये, यासाठी खबरदारीच्या मार्गदर्शक सूचना उपस्थित अधिकार्यांना केल्या.
प्रांताधिकारी अजित नराळे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे, नगर अभियंता मनिष गायकवाड, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे एस. ए. कर्डे, सार्वजनिक बांधकाम उपविभाग शाखा अभियंता अक्षय चौधरी, तालुका कृषि अधिकारी शितल शेवाळे, वनक्षेत्रपाल निलेश भुजबळ, प्रदीप चव्हाण, मोहन चव्हाण, मंडळ अधिकारी संतोष जांभळे (नेरळ), आप्पा राठोड (कर्जत), अरुण विशे (कळंब), भगवान बुरुड (कडाव) यांच्यासह संबंधित कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी बैठकीला उपस्थित होते.
कर्जत तालुक्यात पावसाळ्यात उद्भवणार्या नैसर्गिक आपत्तीविषयी मागील घटनांचा आढावा घेऊन प्रांताधिकारी नैराळे यांनी संबंधित अधिकार्यांना पावसाळ्यापूर्वीच याबाबत खबरदारी घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या तसेच नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास यंत्रणा सज्ज ठेवा, अशा सूचना या बैठकीत केल्या.
दरड प्रणव क्षेत्र, धबधबे, धरण परिसराची अधिकार्यांनी संयुक्त पाहणी करावी व ग्रामस्थ तसेच एनजीओ यांच्याशी संवाद साधावा, भविष्यकालीन उपाययोजनांचा आराखडा तयार करावा, आपत्तीच्या ठिकाणी पर्यटकांना सावधानतेसाठी फलक लावावेत इत्यादी सूचना अजित नैराळे यांनी या वेळी अधिकारी वर्गाला दिल्या.