मुरूड : प्रतिनिधी
मुरूड जंजिरा नगर परिषदच्या 2022 मध्ये होणार्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता सोमवारी (दि.13) सकाळी 11 वाजता नियंत्रण अधिकारी तथा अध्यक्ष नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली व नगर परिषद मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण प्रक्रिया पार पडली.
मुरुड नगर परिषदेची लोकसंख्या 12 हजार 216 असून यंदा होणार्या निवडणुकीत 10 हजार 873 मतदार 20 नगरसेवक निवडूण देणार आहेत.
या वेळी आण्णा कंधारे, महेंद्र चौलकर, ललीत जैन, मंगेश दांडेकर, स्नेहा पाटील, श्रीकांत गुरव, गिरीश साळी,विजय पैर,स्वप्निल कवळे, आशिष दिवेकर, संदिप पाटील, प्रांजली मकु, मृणाल खोत, प्रमोद भायदे, रूपेश पाटील, आदेश दांडेकर, महेश भगत, जगदीश पाटील, श्रीकांत सुर्वे, मंदाकिनी कासेकर, प्रतिभा गायकर, अरविंद गायकर, विजय भोय, मनोहर पानवलकर, उमेश माळी, पाडुरंग आरेकर, सुधीर पाटील, महेश पाटील, सुधीर पाटील आदिंसह नागरिक उपस्थित होते.
प्रभाग आरक्षण
प्रभाग क्रमांक 1 खुला महिला व सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक 2 खुला महिला व सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक 3 खुला महिला व सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक 4 महिला खुला व सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक 4 खुला महिला व सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक 5 खुला महिला व सर्व साधारण.
प्रभाग क्रमांक 6 खुला महिला व सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 7 खुला महिला व सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक 8 अनु. जमाती सर्वसाधारण व महिला.
प्रभाग क्रमांक 9 अनु.जमाती महिला व सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक 10अनु.जमाती महिला व सर्वसाधारण
रोहा नगर परिषदेच्या प्रभाग आरक्षण सोडतीत सारेच नेते खुश
20 पैकी 10 जागा महिलांसाठी राखीव
रोहे : प्रतिनिधी
रोहा नगर परिषेदेची प्रभाग आरक्षण सोडत सोमवारी (दि. 13) काढण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीची लोकसंख्या आरक्षणासाठी पुरेशी नसल्याने त्यांचे आरक्षण न पडल्याने रोहा नगर परिषदेची सोडत पहिल्यांदाच विना आरक्षण काढण्यात आली. मात्र महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव असल्याने रोहा नगर परिषदेच्या 20 पैकी 10 जागा सर्वसाधरण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रभागात संधी मिळणार असल्याने सारेच नेते खुष झाले होते.
रोहा नगर परिषदेच्या कै. द. ग. तटकरे सभागृहात सोमवारी (दि. 13) सकाळी 11 वाजता प्रांताधिकारी दिघावकर मॅडम आणि मुख्याधिकारी धीरज चव्हाण यांच्या उपस्थित प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. या वेळी माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, संजय कोनकर, माजी नगरसेवक महेंद्र गुजर, महेश कोलाटकर, समीर सकपाळ, महेंद्र दिवेकर, जितेंद्र दिवेकर, यशवंत शिंदे, सुभाष राजे, वसंत शेलार, समिक्षा बामणे तसेच अमित उकडे, विघ्नेश भांड, निता हजारे, जैनुदीन लंबाते, मजिद पठाण, अजित मोरे, कादीर रोगे आदींसह सर्व पक्षांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. प्रत्येक प्रभागात पहिल्या क्रमांकाची जागा ही सर्वसाधारण महिला तर दुसर्या क्रमांकाची जागा सर्वसाधरण प्रवर्गासाठी ठेवण्यात आली.
माथेरान पालिकेसाठी प्रभाग आरक्षण जाहीर
कर्जत ़: बातमीदार
तालुक्यातील माथेरान नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 13) प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. नगर परिषदेच्या एकूण 20 पैकी 16जागा सर्वसाधारण, तीन जागा अनुसूचित जाती तर एक जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव झाली आहे. 20 पैकी10 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत.
माथेरान नगर परिषदची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. सोमवारी नगर परिषदेच्या स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहात उपविभागीय अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. या वेळी मुख्याधिकारी सुरेखा भणगे, महसूल अधीक्षक दीक्षांत गोडबोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे आदी उपस्थित होते. त्यांना महसूल अव्वल कारकून नितीन परदेशी, मनोहर गोरेगावकर यांनी सहकार्य केले.
मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी सुरुवातीला आरक्षण सोडतीबद्दल माहिती दिली. त्यात माथेरान पालिकाक्षैत्रात 4393 लोकसंख्या असून त्यातील अनुसूचित जातीमधील 623 आणि अनुसूचित जमातीमधील 183 लोकसंख्या आहे. पालिकेच्या 10 प्रभागातून 20 सदस्य निवडले जाणार आहेत, त्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रभाग चार, पाच आणि सहामध्ये प्रत्येकी एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
प्रणव संतोष ढेबे आणि आर्या शैलेश ढेबे या वीर भाई कोतवाल नगरपालिका शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चीत करण्यात आले. या वेळी माथेरानमधील सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.