अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, महाड, रोहा, माथेरान, पेण, उरण या नगर परिषदांच्या कार्यालयात प्रभाग आरक्षण निश्चित करण्यासाठी सोमवारी (दि. 13) विशेष सभांचे आयोजन करण्यात आले होते. या आरक्षणाकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले होते. विशेषतः सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने नव्याने आरक्षण कसे पडते, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. सोडत जाहीर झाल्यानंतर काहींनी समाधान व्यक्त केले तर अपेक्षित आरक्षण न पडल्याने काहींचा हिरमोड झाला.
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यासाठी अलिबाग नगरपालिका सभागृहात प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी त्यांना सहकार्य केले. यावेळी भाजप, शेकाप, काँग्रेस, शिवसेना आदी पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक, त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अलिबागमधील 20 पैकी एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. ती अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित आहे. अनुसूचित जमातीसाठी तीन जागा राखीव आहे. त्यातील दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव आहेत. त्यानुसार 10 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
अलिबाग प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग क्रमांक 1 अ – खुला महिला, 1 ब- खुला सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक 2 अ- अनुसूचित जमाती महिला,
2 ब- खुला सर्वसाधारण,
प्रभाग 3 अ- खुला महिला, 3 ब- खुला सर्वसाधारण,
प्रभाग 4 अ – खुला महिला, 4 ब- खुला सर्वसाधारण,
प्रभाग 5 अ – अनुसूचित जाती महिला, 5 ब – खुला सर्वसाधारण,
प्रभाग 6 अ- खुला महिला, 6 ब – खुला सर्वसाधारण,
प्रभाग 7 अ- खुला महिला, ब 7- खुला सर्व साधारण,
प्रभाग 8 अ- खुला महिला, 8 ब – खुला सर्वसाधारण,
प्रभाग 9 अ – अनुसूचित जमाती महिला, 9 ब – खुला सर्व साधारण, प्रभाग 10 अ – अनुसूचित जमाती सर्वसाधारण, 10 ब – खुला महिला.
खोपोली नगर परिषदेची आरक्षण सोडत, गम कम खुशी जादा
खालापूर : प्रतिनिधी
खोपोली नगरपालिकेचे प्रभाग आरक्षण सोमवारी (दि. 13) जाहीर झाले. एकूण 31 पैकी तीन जागा अनुसूचित जातीसाठी व एक जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत करण्यात आली. या वेळी 31 पैकी 16 महिला सदस्या निवडून येणार असून, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण सोडत न निघाल्याने सर्वसाधारण गटातील अनेक इच्छुक उमेदवारांच्या चेहर्यावर समाधान दिसून आले तर महिलांची संख्या वाढल्याने काही दिग्गजांना या वेळी आराम मिळणार आहे.
खोपोली नगर परिषद हद्दीत 2011 च्या जनगणनेनुसार 71 हजार 141 मतदार असून, त्यापैकी अनुसूचित जाती प्रवर्गातील सहा हजार 721, आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील तीन हजार 65 मतदार आहेत.
प्रभाग आरक्षण
प्रभाग 1 अ सर्वसाधारण महिला, 2 ब सर्वसाधारण
प्रभाग 2 अ अनुसूचित जाती महिला, 2 ब सर्वसाधारण,
प्रभाग 3 अ अनुसूचित जमाती, 3 ब सर्वसाधारण महिला
प्रभाग 4 अ सर्वसाधारण महिला, 4 ब सर्वसाधारण प्रभाग
5 अ अनुसूचित जाती महिला, 5 ब सर्वसाधारण,
प्रभाग 6 अ सर्वसाधारण महिला, 6 ब सर्वसाधारण
प्रभाग 7 अ सर्वसाधारण महिला, 7 ब सर्वसाधारण
प्रभाग 8 अ सर्वसाधारण, 8 ब महिला सर्वसाधारण,
प्रभाग 9अ अनुसूचित जमाती, 9 ब सर्वसाधारण महिला
प्रभाग 10 अ सर्वसाधारण महिला, 10 ब सर्वसाधारण
प्रभाग 11 अ सर्वसाधारण महिला, 11 ब सर्वसाधारण
प्रभाग 12 अ सर्वसाधारण महिला, 12 ब सर्वसाधारण
प्रभाग 13 अ सर्वसाधारण महिला, 13 ब सर्वसाधारण
प्रभाग 14 अ सर्वसाधारण महिला, 14 ब सर्वसाधारण
प्रभाग 15 अ सर्वसाधारण महिला, 15 ब सर्वसाधारण
16 अ महिला सदस्य