Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या निधीतून विविध विकासकामांना मंजुरी

उरण : वार्ताहर
उरणचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून मतदारसंघातील विविध विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे, परंतु कोरोना प्रादुभार्वामुळे राज्य शासनाकडून विकासात्मक कामे स्थगित असल्याने उरण विधानसभा मतदारसंघातील कामेही रखडली आहेत. दरम्यान, शासनाने नव्या कामांना स्थगिती दिली असली तरी आधी मंजूर झालेल्या कामांना गती द्यावी, अशी आमदार महेश बालदी यांची मागणी आहे.
आमदार महेश बालदी हे कार्यतत्पर लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. जनतेच्या सुखदु:खात ते सदैव धावून जातात. आपल्या उरण मतदारसंघाच्या विकासासाठी ते रात्रंदिवस झटत असतात. त्यांच्या स्थानिक विकास निधीतून जाताडे येथे अंतर्गत रस्ता तयार करण्यासाठी 12 लाख रुपये, डेरवली येथे विसर्जन घाट बांधणे पाच लाख रुपये, आपटा पिंपळआळी येथे अंतर्गत रस्ता तीन लाख रुपये, तुरमाळे येथे अंतर्गत रस्ता तीन लाख रुपये, खानावळे अंतर्गत रस्ता पाच लाख रुपये, चिंचवण फणसवाडी अंतर्गत रस्ता तीन लाख रुपये, कोळखे पारपुंड येथे नदीला संरक्षण भिंत बांधणे 10 लाख रुपये या विविध कामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रार्दुभाव कायम आहे. त्यामुळे या काळात विकासकामांवरही निर्बंध आले आहेत. याच कारणामुळे उरण विधानसभा मतदारसंघातील प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या कामांची वर्कऑर्डर निघालेली नाही. परिणामी या कामांची सुरुवात होऊ शकलेली नाही.
दुसरीकडे चावणे जलशुद्धीकरण केंद्र ते लाडिवली पाण्याच्या टाकीपर्यंत पाइपलाइन टाकण्यासाठी सुमारे 18 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला असून, त्याची वर्कऑर्डर निघालेली आहे. केळवणे येथील खारबंदिस्तीच्या पुनर्स्थापनेसाठी 14 लाख रुपये मंजूर झालेले असून, त्याचीसुद्धा वर्कऑर्डर निघालेली आहे, मात्र सध्या पावसाळा सुरू असल्याने ही कामे करता आली नाही. पाऊस कमी झाल्यावर येत्या काळात या कामांचा शुभारंभ होणार आहे.
कोविड-19 विषाणूचा संसर्ग लक्षात घेऊन आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून उरण विधानसभा मतदारसंघात तीन रुग्णवाहिका लवकरच रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
अशी सर्व वस्तुस्थिती असताना सोशल मीडियात खोटा प्रचार सुरू आहे. त्याकडे लक्ष न देता नागरिकांचे प्रश्न सोडवून त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर आणि पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी स्पष्ट केले आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply