Breaking News

शिवसेनेच्या रणरागिणी भाजपत

भाजप हा महिलांचा आदर व सन्मान करणारा पक्ष -सायली म्हात्रे

उरण : प्रतिनिधी

भाजपत महिलांचा आदर व सन्मान करण्यात येत असल्याने निवडणुकीच्या रणधुमाळीत विविध पक्षातील महिला वर्ग मोठ्या संख्येने भाजपत प्रवेश करत आहेत. अशा महिलांचा भाजप पक्ष निश्चित आदर व सन्मान करेल, असा विश्वास उरण नगरीच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी व्यक्त केला. उरण करंजा गावातील वृषाली विलास देसाई, नयन प्रसाद घरत, अनिता सतीश धनवे, शर्मिला वसंत थळी, पूनम दिनेश थळी, मोनिका मनोहर धोत्रे, मीना चंद्रकांत राजपूत, प्रमोदिनी निखिल धनवे, राजश्री राजेंद्र थळी, आकांक्षा रोहिदास धोत्रे, मंजू अर्जुन कोळी, मीनाक्षी उमेश कोळी, प्रांजल प्रसाद पोतदार, लता जनार्दन कोळी आदींसह शिवसेनेच्या रणरागिणींनी बुधवारी (दि. 9) उरण येथील कार्यालयात भाजपत जाहीर पक्षप्रवेश केला. या वेळी नगराध्यक्षा सायली म्हात्रे बोलत होत्या.

या छोटेखानी कार्यक्रमाचे औचित्य साधून आवरे, कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीतील विविध पक्षांच्या, तसेच विविध जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. या वेळी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, भाजपचे तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर यांनी पक्षप्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी भाजपचे तालुका चिटणीस सुनील पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, भाजप तालुका चिटणीस नरेश गावंड, अजित पाटील, नगरसेवक राजेश ठाकूर, दिनेश वर्तक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply