Breaking News

नॅशनल डान्स कॉन्टेस्ट अ‍ॅण्ड फेस्टिवलमध्ये ‘सीकेटी’च्या विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी

पनवेल : रामप्रहर वृत्त
अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघ नागपूर या संस्थेने आयोजित केलेल्या सहाव्या ऑल इंडिया नॅशनल डान्स कॉन्टेस्ट अ‍ॅण्ड फेस्टिवलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी केली आहे.
सीकेटी विद्यालयाच्या श्रावणी अमर थळे या नववीतील विद्यार्थिनीने वैयक्तिक भरतनाट्यम आणि द्वंद्व नृत्य स्पर्धेत प्रथम, तर समूह नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. याच स्पर्धेत इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी सई मयूरेश
जोशी हिने वैयक्तिक भरतनाट्यम स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
‘परिश्रम केल्यानंतर यश मिळते, यश मिळाल्यावर आनंद मिळतो. परिश्रम तर सगळेच करतात, परंतु यश हे त्यांनाच मिळते जे कठोर परिश्रम करतात,’ असा संदेश देत संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन व कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या दोन्हीही विद्यार्थिनी सीकेटी विद्यालयाच्या गुणी आणि मेहनती विद्यार्थिनी असून आजपर्यंत अनेक नृत्य स्पर्धेत त्यांनी विविध पारितोषिके पटकावित विद्यलयाचे नाव उज्वल केले आहे, असे या वेळी मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, यशस्वी विद्यार्थिनींचे आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी गडदे, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply