नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी येत्या दीड वर्षात सुमारे 10 लाख पदभरती करण्यात यावी, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत. या अंतर्गत सरकारच्या विविध खात्यांमध्ये आणि मंत्रालयांत काम मिळणार आहे.
पीएमओ ट्विटर अकाऊंटवरून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्रालये आणि विभागांमधील मानव संसाधनांचा आढावा घेतला आहे. यासोबतच येत्या दीड वर्षात मिशन मोडवर काम करून 10 लाख लोकांची भरती करावी, असे आदेशही त्यांनी सरकारला दिले आहेत, असे या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …