पोलादपूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग (जिल्हा परिषद, नगर परिषद व महापालिका क्षेत्र) या नोंदणीकृत संघटनेतर्फे यंदा प्राथमिक शिक्षकांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यामध्ये कोंढवी पळचिल केंद्र संघाने कापडे देवळे केंद्र संघावर मात करीत विजेतेपद पटकाविले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त दरवर्षी विविध गुणदर्शन सोहळा आयोजित करणार्या शिक्षक संघटनेतर्फे यंदा प्रथमच शिक्षकांसाठी क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पोलादपूर तालुक्याच्या सर्व केंद्रांतील प्राथमिक शिक्षकांनी सहभाग घेऊन क्रिकेट खेळातील प्राविण्य सादर केले.
पोलादपूर तालुका मर्यादित प्राथमिक शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धेत विजेत्या कोंढवी पळचिल केंद्र संघास 5001 रुपये व चषक, उपविजेत्या कापडे देवळे केंद्र संघास 3001 रुपये व चषक, तृतीय क्रमांक प्राप्त कोतवाल बुद्रुक केंद्र संघास 2001 रुपये व चषक, तर पोलादपूर तुर्भे केंद्र संघास चौथ्या क्रमांकाचे 1001 रुपये व चषक अशी पारितोषिके महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या पोलादपूर शाखेतर्फे देण्यात आली. कोंढवी केंद्राचे शरद थोरात हे शिक्षक मालिकावीर ठरले. कापडे केंद्राचे अशोक शेळवणे यांची उत्कृष्ट फलंदाज, पळचिल केंद्राचे अमोल शिंदे उत्कृष्ट गोलंदाज, तर कापडे केंद्राचे रामकृष्ण जगताप यांची उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून निवड करण्यात येऊन तिघांनाही चषक देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभास शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, पोलादपूर पंचायत समिती सदस्य यशवंत कासार, कॅप्टन विष्णू नारायण सावंत, कार्यवाह विजय पवार, केंद्रप्रमुख शिवाजी महाडिक, पंकज निकम, अरुण मोरे, सचिन खोपडे, वैभव कांबळे, सचिन दरेकर, मंगेश चिले, बालाजी गुबनरे, दीपक साळवी, भिकाजी मांढरे यांच्यासह पोलादपूर तालुक्यातील शिक्षक परिषदेचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …