Breaking News

नवी मुंबईकरांना भामट्या महिला गँगची दहशत

नवी मुंबई ः बातमीदार

नवी मुंबईत घरात घुसून चोरी करणार्‍या महिलांची गँग सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. या महिलांच्या पेहरावावरून या महिला निराश्रीत वाटत आहेत. सिडकोची बैठी घरे हेरून व एकत्र जात या महिला चोरी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नवी मुंबईत खळबळ माजली असून नागरिकांमध्ये घाबराट पसरली आहे.  कोपरखैरणे से. 19, से. 3 घणसोली, वाशी-28, नेरुळ व सिवूड्स येथे बैठी घरे या महिलांकडून हेरली जात आहेत. आजूबाजूचा शांत परिसर बघून या महिला उघडा दरवाजा पाहून थेट घरात घुसत घुसून मोबाईल अथवा महागड्या वस्तू लंपास करत आहेत. एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असल्याने सध्या नागरिक घरात राहणे पसंत करत आहेत. परिसरातील वावरदेखील नागरिकांचा कमी झाला आहे. त्यामुळे शांत परिसर बघून अर्धवट उघडे दरवाजे हेरले जात आहेत. गटागटाने एकत्र येत थेट दरवाजातून डोकावून पाहत आहेत. घरात कोणीही नसल्याचे पाहून घरात शिरण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर घरात एकटी महिला असल्यास तिच्याकडे खाण्यासाठी पदार्थ किंवा अगदीच पाणी मागितले जात आहे. पाण्याला कोणीही नाही म्हणत नसल्याने घरातील महिला पाणी आणण्यास गेली की, घरात शिरून थेट मिळेल तो वस्तू लंपास केली जात आहे. मुख्य म्हणजे तोपर्यंत गटातील महिला आजूबाजूच्या परिसरात लक्ष ठेवले जात असून, महिलेने चोरलेल्या वस्तू इतर महिला आपल्या भोवती गुंडाळलेल्या शालित लपवून महिला पसार होत आहेत. जर कोणीही संशयाने तपासणी केल्यास आधीच वस्तू दुसर्‍या महिलेकडे दिल्याने संशयित महिलांकडे काहीही आढळत नसल्याचे दिसून येत आहे. जर अगदीच रहिवाशी संतापले तर कडेवर असलेल्या लहान मुलांचा आधार घेत स्वतःची सुटका केली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी नवी मुंबईतील शांत परिसर हेरून पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पोलिसांनी बैठ्या चाळी, रो हाऊस व सिडकोची बैठी घरे अशा ठिकाणी पेट्रोलिंग वाढवणे गरजेचे आहे. या महिला निराश्रीत वाटत आहेत. नवी मुंबईतील रेल्वेस्थानके, उड्डाण पुलाखली वास्तव्य असणार्‍या महिलांसारखे त्यांचे पोषख असून पोलिसांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

-मनोज मेहेर, नागरिक, नेरुळ

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply