Breaking News

आषाढी वारी ः रिंगण सोहळ्यातील सुवर्णध्वजाचा मान मुरूडच्या भोपळे दिंडीला

मुरूड : प्रतिनिधी

पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शनासाठी वारकरी आळंदीहून माउलींच्या पालखीसोबत प्रस्थान करतात. या वारीत श्रीवर्धन आणि मुरूड तालुक्यातील 300 वारकरी  (भोपळे दिंडी क्र.14) दरवर्षी सहभागी होतात. वारीतील रिंगण सोहळ्यात धावणार्‍या घोड्यावरील सुवर्णध्वजाचा मान मुरूड येथील भोपळे दिंडीचा आहे.

झेंडकरी देविदास महाराज लोखंडे, दिंडीचे अध्यक्ष माऊली महाराज लोखंडे, भाई मिठागारी, अनंता पाटील, दिपेश परवे (सर्व रा. मुरूड) आदी भोपळे दिंडीचे नियोजन करतात. ही दिंडी नुकताच मुरूडहून रवाना झाली आहे.

वारीतील रिंगण सोहळ्यात अश्वांची पूजा झाल्यानंतर मुरूडच्या भोपळे दिंडीच्या जरीपटक्याच्या ध्वजाने रिंगणाला दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्या जातात. त्यानंतर  स्वाराचा अश्व रिंगणासाठी सोडण्यात येतो. या रिंगण सोहळ्यात धावणार्‍या घोड्यावर मुरूड येथील भोपळे दिंडीचा सुवर्णध्वज असतो. या वेळी लाखो भाविक माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचा जयघोष सुरू करतात. हा रिंगण सोहळा मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात पार पडतो.

वारीतील रिंगण सोहळ्यात धावणार्‍या घोड्यावरील सुवर्ण ध्वजाचा मान मुरूड येथील भोपळे दिंडीचा असतो, ही गोष्ट अनेकांना माहिती नाही. मात्र सुवर्ण ध्वजाचा मान भोपळे दिंडीला मिळत असल्याबद्दल रायगडातील वारकर्‍यांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply