Breaking News

आमदार भरत गोगावलेंच्या समर्थनार्थ महाडमध्ये शिवसेना पदाधिकारी एकवटले

स्थानिक स्तरावर वाढता पाठिंबा

महाड : प्रतिनिधी
शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षनेतृत्वाविरुद्ध केलेल्या बंडामध्ये महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले हेही सहभागी झाले आहेत. त्यांच्या समर्थक पदाधिकार्‍यांनी शनिवारी (दि. 25) घेतलेल्या बैठकीत आमचा पाठिंबा भरतशेठलाच, असा एकमुखी निर्धार केला.
शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या शिवनेरी निवासस्थानी पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीस शिवसेनेचे महाड तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, विजय सावंत, माजी सभापती विजय धाडवे, सपना मालुसरे, तालुका संपर्कप्रमुख रवींद्र तरडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला सुमारे 300 पदाधिकारी उपस्थित होते. तीन वेळा आमदार झालेल्या गोगावले यांना महाविकास आघाडीत मंत्रिपद मिळेल अशी आशा महाडकर नागरिकांना होती, मात्र त्यांना मंत्रिपासून दूर ठेवून राष्ट्रवादीला मंत्रिपद दिल्याच्या राग या वेळी उपस्थित पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात वारंवार निधीवाटपातदेखील शिवसेनेला कायम मागे ठेवले जात होते. त्यातच आमदार भरत गोगावले यांच्याकडून केल्या जाणार्‍या कामांचे श्रेय लाटण्याचे काम पालकमंत्री करीत असल्याचे तालुकाप्रमुख सुरेश महाडिक यांनी म्हणत आम्ही कायम आमदार भरत गोगावले यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले, तर शिवसेना संपविण्याचे काम काँग्रेस-राष्ट्रवादी करीत असल्याचा आरोप या वेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर यांनी केला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply