Breaking News

‘पिल्लई’मध्ये क्रीडा व्यवस्थापनाचे धडे

पनवेल ः वार्ताहर

विद्यार्थ्यांना क्रीडा व्यवस्थापनाचे धडे गिरविण्याची संधी देण्यासाठी महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फिफा आणि सीआयईएस संस्थांशी करार केला आहे. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन आणि स्वित्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा अभ्यास केंद्र (सीआयईएस) या जागतिक संस्थांच्या माध्यमातून दिला जाणारा क्रीडा व्यवस्थापनातील क्रीडा व्यवस्थापन कार्यक्रम नवीन पनवेल महात्मा एज्युकेशन सोसायटीत उपलब्ध करण्यात आला आहे. जगातील विविध 15 देशांमध्ये खेळाडूंना या दोन संस्थांच्या माध्यमातून क्रीडा व्यवस्थापनाचा अभ्यास शिकविला जातो. भारतात यापूर्वी कुठेही न शिकविला जाणारा अभ्यासक्रम पनवेलच्या पिल्लई संस्थेत उपलब्ध करण्यात आला आहे. पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन आणि सीआयईएस या संस्थांमध्ये मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांतून अखेर हा करार करण्यास यश आले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply