Breaking News

शासन शेतकर्यांच्या पाठीशी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सावरण्यासाठी व त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी शासन भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे सांगून पात्र शेतकर्‍यांना विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळावी यासाठी पंचनामे तातडीने होणे आवश्यक आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पंचनामे वेळेवर आणि अचूक होतील यासाठी क्षेत्रीय स्तरावर बैठका घ्याव्यात. तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 6) दिले.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचे दौरे राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी केले. त्याचा अहवाल सादर करण्यासाठी सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री रामदास कदम, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

राज्यात यंदा झालेला अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, पूरस्थिती या घटना गेल्या 30 ते 40 वर्षांत प्रथमच इतक्या तीव्रतेने घडल्या. सर्वत्र पीक चांगले असताना नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत शेतकरी व शेतमजुरांना सावरण्यासाठी, रोजगार-अन्नसुरक्षा यांसारख्या उपाययोजनांतून दिलासा देण्यास यंत्रणांनी कार्यवाही करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply