पनवेल ः वार्ताहर
मावळ लोकसभा मतदारसंघात घराणेशाही विरुद्ध सर्वसामान्यांचा प्रतिनिधी असा सामना आहे. विरोधकांनी सत्तेत असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आणि म्हणून जनतेने 2014 साली त्यांना घरी बसवले. भ्रष्टाचारातून लुटलेल्या पैशांतून ही निवडणूक राष्ट्रवादीचा उमेदवार लढवत आहे, पण जनता सज्ञान आहे. ती मला पुन्हा संसदेत जाण्याचे भाग्य प्राप्त करून देईल, असे मत महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी कोन येथे व्यक्त केले.
देशात पुन्हा नरेंद्र मोदी यांचे सरकार आणण्यासाठी श्रीरंग बारणे यांना आपले अमूल्य मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करून पंतप्रधानांचे हात मजबूत करा, असे आवाहन उरणचे आमदार मनोहर भोईर यांनी या वेळी केले. पळस्पे जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन मंगळवारी (दि. 2) करण्यात आले होते. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरण मतदारसंघाचे आमदार मनोहर भोईर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, दत्ता दळवी, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, प्रल्हाद केणी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, सल्लागार बबन पाटील, संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सदस्या रेश्मा शेळके, पंचायत समिती सदस्य राज पाटील, भूपेंद्र पाटील, शिरवली विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे, परेश पाटील, तानाजी खंडागळे यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
