Breaking News

रायगडात पावसाची संततधार

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 1) सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 61.04 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. अलिबाग तालुक्यात सर्वाधिक 116 मिमी पावसाची नोंद झाली. 1 जून ते 30 जून या महिनाभरात सरासरी 418.26 मिमी पाऊस पडला असून एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 13.49 टक्के आहे.
रायगड जिल्ह्यात गेले दोन दिवस अधूनमधून पावसाच्या सरी येत आहेत. पावसाचा जोर उत्तर रायगडमध्ये जास्त होता. अलिबाग, मुरूड व उरण या तीन तालुक्यांमध्ये सरासरी शंभर मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला.
पावसाची सरासरी (मिलीमीटरमध्ये)
अलिबाग 116, पेण 72, मुरूड 104, पनवेल 60.60, उरण 103, कर्जत 34.60, खालापूर 50, माणगाव 47, रोहा 58, सुधागड 52, तळा 61, महाड 22, पोलादपूर 41, म्हसळा 36, श्रीवर्धन 87, माथेरान 32.40,  976.60, सरासरी 61.04.
ऑरेंज अलर्ट
हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेज अलर्ट) देण्यात आला आहे .जिल्ह्यात पुढील दोन दिवसात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तीव्र ते अतितीव्र पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
लावणीच्या कामाला सुरूवात
दोन दिवस झालेल्या चांगल्या पावसामुळे सर्वाधिक समाधानी आहे तो शेतकरी वर्ग. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे भाताची रोपे उगवून चांगली वर आली आहेत. मात्र पाऊस नसल्याने लावणीची कामे खोळंबली होती. शेतकरयांना मोठया पावसाची प्रतिक्षा होती. दोन दिवसात झालेल्या पावसामुळे शेतात चांगले पाणी साचले आहे. दक्षिण रायगडात महाड परीसरात लावणीच्या कामांना आजपासून सुरूवात झाली आहे. शेतात साचलेल्या पाण्यावर शेतकरी शेतीची कामे करत आहेत . नांगरणीबरोबरच चिखलणी , शेतातील गवत काढणे लावणी करणे अशी कामे सुरू झाली आहेत . त्यासाठी पारंपारीक बैलजोडीच्या नागरांबरोबरच  यांत्रिक पॉवर टीलरचाही वापर केला जात आहे.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply