Breaking News

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते डॉ. पाटील क्लिनिकचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

आदई गावाचा विस्तार होत चालला असून परिसरामध्ये वैद्यकीय सेवांचाही विस्तार होण गरजेचे होते. त्यामुळे डॉ. सुयश पाटील यांनी सुरू केलेल्या या क्लिनिकचा परिसरातील नागरिकांना फायदा होईल असे मत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केले. आदई गावात डॉ. सुयश शैलेंद्र पाटील यांनी नव्याने डॉ. पाटील क्लिनिक सुरू केले आहे. या क्लिनिकचे पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 1) उद्घाटन झाले.

या वेळी पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे, नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, अ‍ॅडव्होकेट मनोज भुजबळ, डॉक्टर संतोष आगलावे, शैंलेद्र पाटील, किशोर मोरे, जयराम मुंबईकर, कमलाकर घरत, जयेश ठाकूर, हेमंत पाटील, हरीदास शेंडे, जितेंद्र निंबाळकर, सरोज मोरे, पराग म्हात्रे, डॉ. दिकीपराव मोरे, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. गजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply