Breaking News

शेलू रेल्वेस्थानक परिसरातील रस्ते खड्डेमय

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील शेलू गावातील मुख्यरस्ता सध्या खड्ड्यांनी भरला आहे. या शेलू स्टेशनरोडचे काम करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दोन कोटींचा निधी मंजूर केला होता, मात्र रस्त्याचे काम सुरु झाले नाही, त्यामुळे तो निधी परत गेला होता.

कर्जत तालुक्यातील शेलू येथे मध्य रेल्वेचे स्थानक आहे. शेलू गावातून रेल्वे स्थानकाकडे येणारा रस्ता सुमारे एक किलोमीटर लांबीचा आहे. गेल्या अनेक वर्षात या रस्त्याचे डांबरीकरण केले गेले नाही. त्यामुळे त्याची अवस्था खड्ड्यात हरवलेल्या रस्त्यासारखी झाली आहे.  या रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणात घरे असून,     त्यातील बहुतेक घरे बैठी असल्याने रस्त्याची उंची आणि घराची उंची सारखीच झाली आहे. त्यामुळे जास्त पाऊस झाला तर अनेकांच्या घरात पाणी जाते.

शेलू गावातील या मुख्य रस्त्याच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यामधून या रस्त्याचे काँक्रीटीकरण केले जाणार होते. मात्र ठेकेदार कंपनीने निर्धारित वेळेत काम सुरु केले नाही, त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी मंजूर झालेला निधी परत  गेला होता. त्यामुळे शेलू गावातील हा मुख्य रस्ता आजही खड्ड्यात हरवला आहे. स्थानिकांना या खड्डेमय रस्त्याने प्रवास करावा लागत आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply