पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना महामारीच्या काळात अनेक हॉस्पिटल्समध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताची ही तूट भरून काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या माध्यमातून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध ठिकाणी मंगळवारी (दि. 2) रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहे.
फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करून पनवेल येथे भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रभाग क्रमांक 14, 18 व 19च्या वतीने रक्तदान शिबिर होणार आहे. नवीन पनवेल प्रभागात क्रमांक 16 व भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहर यांच्या वतीने नवीन पनवेल येथील कर्नाटक संघ हॉलमध्ये, भारतीय युवा मोर्चा कर्जत मंडलच्या वतीने श्री कपालेश्वर मंदिर येथे, तर पनवेल तालुका भारतीय युवा मोर्चा व धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेच्या वतीने सुकापूर येथील लक्ष्मी पब्लिक स्कूल येथे रक्तदान शिबिर होणार आहे. सकाळी 9 वाजता या रक्तदान शिबिरांना सुरुवात होणार असून, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक लोकप्रतिनिधी, युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते या उपक्रमासाठी सज्ज झाले आहेत.
रोगप्रतिकारक गोळ्या आणि मास्कचे वाटप
पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच प्रतीक्षा केणी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांच्या माध्यमातून तळोजे फेज 1 व 2मधील नागरिकांना अर्सेनिक अल्बम-30 या रोगप्रतिकारक गोळ्यांच्या 3500 बाटल्यांचे आणि 2000 मास्कचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, मंडल उपाध्यक्ष निर्दोष केणी, प्रतीक्षा केणी, जगदीश घरत, आशा बोरशे, रमेश सावंत, शकुंतला लवटे, मेघा जगताप, ज्योत्स्ना सूर्यवंशी, प्रज्ञा मुगुटकर, ललितादेवी चौरसिया, प्रशांत लवटे उपस्थित होते.
Check Also
केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …